Mumbai News : समुद्राच्या पोटातून जाणारा वाहतूक मार्ग काही वर्षांपूर्वी आश्चर्याची बाब वाटत असतानाच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर साकारण्यात आलं आणि प्रशासनासह अनेकांच्या अथक परिश्रमांतून कोस्टल रोड अर्थात सागरी किनारा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत आला. देशात अशा पद्धतीचा मार्ग तयार केला जाण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळं हा कोस्टल रोड अनेकांच्या कुतूहलाचा विषय. पण, याच कुतूहलावर विरजण पडलं आहे, कारण मुंबईतील कोस्टल रोडवर पहिल्या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी दुपारच्या सुमारास कोस्टल रोडवर हा अपघात झाला. ज्यानंतर या मार्गावर काही वेळासाठी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. अपघातनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमुळं घटनास्थळाची दृश्य सर्वांसमोर आली. कोस्टल रोडच्या लोकार्पणानंतर हा पहिलाच अपघात असून, यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती देण्यात येत आहे. 


अपघातनंतर लगेचच तिथं काय घडलं? 


प्राथमिक माहितीनुसार अपघातानंतर  इमर्जन्सी कॉल बॉक्स (ECB)मधून एका व्यक्तीनं संपर्क साधत  CP-5 पाशी असणाऱ्या बोगद्यामध्ये दुर्घटना झाल्याची माहिती दिली. ज्यानंतर तातडीनं सीसीटीव्हीच्या माध्यमातून या घटनेची पडताशळणी करण्यात आली. जिथं काळ्या रंगाच्या टोयोटा कारला अपघात झाल्याची बाब समोर आली. 


हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 Live Updates : 'या' जागांवरील उमेदवारीसाठी महायुतीत चुरस; गृहक्लेश संपेना 



कारचं स्टेअरिंग सैल झाल्यामुळं अपघात घडल्याची माहिती कारचालकाकडून मिळाली असून, या कारमधून प्रवास करणारे दोनजण सुरक्षित असल्याचं वृत्त मिळत आहे. या अपघातात कारला मोठं नुकसान झालं असून, या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम हाती घेतलं आणि तेथील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याच्या अनुषंगानं पावलं उचलली. याशिवाय अपघातानंतर कारचं ऑईल बोगद्यामध्ये पसरल्यामुळं कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी हे ऑईलही स्वच्छ करण्याचं काम करण्यात आलं.