Mumbai Coastal Road Project: मुंबईकरांचा नव्या वर्षात प्रवास आरामदायी व सूकर होणार आहे. मुंबई सागरी किनारा मार्ग म्हणजेच कोस्टल रोडचा अंतिम टप्पा प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अंतिम टप्पा सेवेत येऊ शकतो. या मार्गाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. हाजी अली ज्यूस सेंटर ते वरळी नाक्यापर्यंतची आंतरबदल मार्गिका क्रमांक 2 अलीकडेच मुंबई महानगरपालिकेने सुरू केली. त्यामुळे या रोडवरील हाजी अली ते वांद्रे-वरळी सी लिंकदरम्यानच्या आठपैकी सहा आंतरबदल मार्गिका सुरू झाल्या आहेत. उर्वरित दोन मार्गिकाही लवकरच सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोस्टल रोडचे काम 95 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंतिम टप्पा सेवेत आणण्याचा प्रयत्न आहे. कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. यात अनेक ठिकाणी आंतरबदल मार्गिका देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना वळसा न घालता इच्छितस्थळी पोहोचता येईल. 


कोस्टल रोडच्या अंतिम टप्प्यातील सी लिंक विस्तारासाठी उत्तरेकडील गर्डरची उभारणी करण्यात आली आहे. यानंतर काँक्रिटीकरण, विद्युत खांबांची उभारणी यांसह अन्य तांत्रिक कामे डिसेंबरअखेर पूर्ण करून संपूर्ण मार्ग खुला केला जाणार आहे. संपूर्ण कोस्टलचे काम जानेवारी २०२५च्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. डिसेंबरअखेरीस उत्तरेकडील मार्गावरून मरिन ड्राइव्ह ते वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंतची मार्गिका खुली करण्यात येणार आहे. संपूर्ण मार्ग सेवेत आल्याने मरिन ड्राइव्ह ते वांदे- वरळी सी लिंकवरून पुढील प्रवास काही मिनिटांत करणे शक्य होणार आहे


हाजी अली रोडवरील 8 मार्गिका


मरिन ड्राइव्ह/अमरसन्स/हाजी अली ते लोटस जंक्शन/वरळी


हाजी अली ते वरळी कोस्टल रोड/वांद्रे सी लिंक


लोटस जंक्शन ते मरिन ड्राइव्ह/अमरसन्स


वांद्रे/वरळी ते हाजी अली (महालक्ष्मी/ पेडर रोड)


मरीन ड्राइव्ह/अमरसन्स ते हाजी अली जंक्शन (महालक्ष्मी/पेडर रोड)


हाजी अली ज्यूस सेंटर ते कोस्टल रोड (मरिन ड्राइव्ह/अमरसन्स)


कोस्टल रोड वांद्रे-वरळी ते लोटस जंक्शन (वरळी) 


लोटस जंक्शन वरळी ते कोस्टल रोड (वांद्रे)