COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी पोलीसांना चकवा दिलाय. संजय निरुपम यांना नजरकैद करण्यासाठी सकाळी पोलीस त्यांच्या घरी पोहचले, मात्र पोलीस येण्यापूर्वीच निरुपम मागील गेटने निघून गेले होते.  निरूपम सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडणार होते पण याआधीचे अनुभव पाहता ते वेळेआधीच घराबाहेर पडले.


मोबाईल बंद 


थोड्याच वेळात ते अंधेरी पुर्वेला आंदोलना ठिकाणी पोहोचतील. मुंबई पोलिस फोन ट्रॅक करुन आपल्या अडवतील या काळजीने त्यांनी आपला मोबाईल फोनही बंद ठेवला आहे.


आधीच घराबाहेर  


मागील दोन वेळा आंदोलन करण्याच्या इशारा दिल्यानंतर पोलीसांनी निरुपम यांना त्यांच्या घरीच नजरकैद केले होते. मागील अनुभव लक्षात घेता निरुपम यावेळी पोलीस घरी पोहचण्याआधीच घराबाहेर पडले.


कडेकोट बंदोबस्त 


भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलना दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसंच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याला पोलिसांचे प्राधान्य आहे. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी पोलिसांची जादा कुमक ठेवण्यात आलीय.


बंदची हाक 


पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडर भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आलीय. सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात हा बंद पाळण्यात येणार आहे. कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करत आहेत.