Mumbai Corona Update | दिलासादायक| कोरोना रुग्णसंख्येत घट, दुप्पट रुग्ण बरे
शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) झपाट्याने वाढ झाली होती.
मुंबई : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) झपाट्याने वाढ झाली होती. या वाढीमुळे महापालिकेसह मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट होत आहे. त्यामुळे काही प्रमाणात मुंबईकरांना (Mumbaikar) दिलासा मिळाला आहे. मुंबईत गुरुवार 13 जानेवारीच्या तुलनेत रुग्णसंख्येत घट झालेली आहे. तर त्यापेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (mumbai corona update 14 january 2022 today 11 thousand 317 patients found in city)
मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 11 हजार 317 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 22 हजार 73 रुग्ण कोरनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा आता 89 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा 39 दिवस इतका आहे.
कोरोनामुळे 24 तासात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी 13 जानेवारीला कोरोनामुळे 6 जण दगावले होते. तर गुरुवारी 13 हजार 702 जणांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच 20 हजार 849 जण कोरोनामुक्त झाले होते. सातत्याने कमी होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील तारीखनिहाय आकडेवारी
1 जानेवारी - 6 हजार 347
2 जानेवारी - 8 हजार 063
3 जानेवारी - 8 हजार 082
4 जानेवारी - 10 हजार 860
5 जानेवारी - 15 हजार 166
6 जानेवारी - 20 हजार 181
7 जानेवारी- 20 हजार 971
8 जानेवारी- 20 हजार 318
9 जानेवारी - 19 हजार 474
10 जानेवारी - 13 हजार 648
11 जानेवारी - 11 हजार 647
12 जानेवारी - 16 हजार 420
13 जानेवारी - 13 हजार 702
14 जानेवारी - 11 हजार 317