मुंबईकरांनो काळजी घ्या! कोरोना रुग्णसंख्येत आज पुन्हा वाढ
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत असताना आज किंचित वाढ
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होताना दिसत आहे. काल मुंबईत 5 हजार 956 रुग्ण आढळले होते. पण आज मुंबईच्या दैनंदिन रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली आहे.
मुंबईत आज किती रुग्ण?
मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 149 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या चोवीस तासात 12 हजार 810 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबई बरे झालेल्या रुग्णांचा दर 94 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर 61 दिवसांवर आला आहे.
तर आज 7 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. मृत रुग्णांपैकी 6 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर 5 रुग्णांचं वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. मृतांमध्ये 1 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे.
मुंबईत सध्या 44 हजार 084 सक्रिय रुग्णांची संख्या आहे.
मुंबईतील तारीखनिहाय आकडेवारी
1 जानेवारी - 6 हजार 347
2 जानेवारी - 8 हजार 063
3 जानेवारी - 8 हजार 082
4 जानेवारी - 10 हजार 860
5 जानेवारी - 15 हजार 166
6 जानेवारी - 20 हजार 181
7 जानेवारी- 20 हजार 971
8 जानेवारी- 20 हजार 318
9 जानेवारी - 19 हजार 474
10 जानेवारी - 13 हजार 648
11 जानेवारी - 11 हजार 647
12 जानेवारी - 16 हजार 420
13 जानेवारी - 13 हजार 702
14 जानेवारी - 11 हजार 317
15 जानेवारी - 10 हजार 661
16 जानेवारी - 7 हजार 895
17 जानेवारी - 5 हजार 956
18 जानेवारी - 6 हजार 149