मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) गेल्या काही दिवसांपासून कमालीची घट पाहायला मिळतेय. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळतोय. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये गुरुवारच्या तुलनेत 700 कमी रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज शुक्रवार (21 जानेवारी) 5 हजार 8 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत गुरुवारी 5 हजार 708 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. (mumbai corona update 21 january 2022 today 5 thousand 8 corona patients found in city and 12 deaths) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 12 हजार  913 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 97 टक्के इतका झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा 93 दिवसांवर जाऊन पोहचला आहे. 


मुंबईतील तारीखनिहाय आकडेवारी


1 जानेवारी -  6 हजार 347


2 जानेवारी -  8 हजार 063


3 जानेवारी -  8 हजार 082


4 जानेवारी - 10 हजार 860


5 जानेवारी - 15 हजार 166 


6 जानेवारी - 20 हजार 181


7 जानेवारी- 20 हजार 971


8 जानेवारी- 20 हजार 318


9 जानेवारी - 19 हजार 474


10 जानेवारी - 13 हजार 648


11 जानेवारी - 11 हजार 647


12 जानेवारी - 16 हजार 420 


13 जानेवारी - 13 हजार 702


14 जानेवारी - 11 हजार 317 


15 जानेवारी - 10 हजार 661 


16 जानेवारी - 7 हजार 895


17 जानेवारी - 5 हजार 956


18 जानेवारी - 6 हजार 149 


19 जानेवारी - 6 हजार 32


20 जानेवारी - 5 हजार 708 


21 जानेवारी - 5 हजार 8 


 केंद्र सरकारची लहान मुलांसाठी नवी नियमावली


दरम्यान, लहान मुलांसाठी केंद्र सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. यामध्ये 5 वर्ष वयापर्यंतच्या मुलांना मास्कची आवश्यकता नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय. लहान मुलांसाठी मास्क गरजेचं नसल्याने शाळांसाठी हा मोठा निर्णय आहे. मात्र 6 वर्षांपासून पुढच्या सगळ्यांना मास्क बंधनकारक आहे.


मुलांची काळजी घ्या


लहान मुलांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत आहे. औरंगाबादमध्ये 1 जानेवारीपासून 515 बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 6 ते 14 वयोगटातील 257 मुलांना संसर्ग झाला आहे. तर 15 ते 18 वयोगटातील 209 मुलांना संसर्ग झाला आहे. तर 5 वर्षांखालील 50 मुलांना संसर्ग झाला आहे. यात मोठ्यांप्रमाणे बालकांमध्ये ही सेम लक्षण दिसून येत आहेत.