Mumbai Corona Update | कोरोना रुग्णांच्या आकड्यात सातत्याने घट, मुंबईत दिवसभरात किती रुग्ण?
ज्या झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढ झाली होती, त्याच वेगाने आता दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे.
मुंबई : शहरासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह (Mumbai Corona Update) रुग्ण आढळत होते. मुंबईत तर 20 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले होते. दररोज झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र ज्या झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढ झाली होती, त्याच वेगाने आता दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. (mumbai corona update 22 january 2022 today 3 thousand 568 corona postive patients found in city)
मुंबईत गेल्या 24 तासात 3 हजार 568 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा 105 दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
मुंबईतील तारीखनिहाय आकडेवारी
1 जानेवारी - 6 हजार 347
2 जानेवारी - 8 हजार 063
3 जानेवारी - 8 हजार 082
4 जानेवारी - 10 हजार 860
5 जानेवारी - 15 हजार 166
6 जानेवारी - 20 हजार 181
7 जानेवारी- 20 हजार 971
8 जानेवारी- 20 हजार 318
9 जानेवारी - 19 हजार 474
10 जानेवारी - 13 हजार 648
11 जानेवारी - 11 हजार 647
12 जानेवारी - 16 हजार 420
13 जानेवारी - 13 हजार 702
14 जानेवारी - 11 हजार 317
15 जानेवारी - 10 हजार 661
16 जानेवारी - 7 हजार 895
17 जानेवारी - 5 हजार 956
18 जानेवारी - 6 हजार 149
19 जानेवारी - 6 हजार 32
20 जानेवारी - 5 हजार 708
21 जानेवारी - 5 हजार 8
22 जानेवारी - 3 हजार 568