मुंबई : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) लक्षणीय वाढ झाली. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात 300 च्या आत असलेला दररोजचा रुग्णांचा आकडा हा 20 हजारच्या पार गेला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र आता कोरोना रुग्णांचा आकडा स्थिरावताना दिसतोय. कोरोना रुग्णसंख्ये क्वचित घट झाली आहे. (mumbai corona update 8 january 2022 today 20 thousnad 318 corona positive patients found in city)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत गेल्या 24 तासात शुक्रवारच्या तुलनेत 653 कमी कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज 20 हजार 318 रुग्णांची नोंद झाली आहे. तर हाच आकडा शुक्रवारी 7 जानेवारीला 20 हजार 971 इतका होता.  
 
दिवसभरात 6 हजार 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 86 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा आता 47 दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.   


तारीख आणि रुग्णसंख्या


1 जानेवारी -  6 हजार 347


2 जानेवारी -  8 हजार 063


3 जानेवारी -  8 हजार 082


4 जानेवारी - 10 हजार 860


5 जानेवारी - 15 हजार 166 


6 जानेवारी - 20 हजार 181


7 जानेवारी- 20 हजार 971


8 जानेवारी- 20 हजार 318