मुंबई : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) झपाट्याने वाढ होत आहे. डिसेंबर 2021 च्या पहिल्या पंधरवड्यात 500 च्या खाली असलेला आकडा हा नववर्षात 20 हजारच्या पार गेला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये गुरुवारच्या तुलनेत जवळपास 800 अधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबईत गुरुवारी  20 हजार 181 रुग्णांची नोंद झाली होती. (mumbai corona update today 7 january 2022 20 thousand 971 total patients found in city and suburban) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानगरी मुंबईत आज कोरोनाचे 20 हजार 971 रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 8 हजार 490 जण दिवसरात कोरोनामुक्त झाले आहेत.   



तारीख आणि रुग्णसंख्या


1 जानेवारी -  6 हजार 347


2 जानेवारी -  8 हजार 063


3 जानेवारी -  8 हजार 082


4 जानेवारी - 10 हजार 860


5 जानेवारी - 15 हजार 166 


6 जानेवारी - 20 हजार 181


7 जानेवारी- 20 हजार 971


रक्षकच कोरोनाच्या विळख्यात


राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यामध्ये पोलिसांनाही कोरोनाने गाठलं आहे. राज्यात वाढत्या कोरोनामुळे संसर्गामुळे राज्य सरकारने निर्बंध कठोर केले आहेत. या नियमांची आणि निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र पोलिसच या कोरोनाच्या कचाटात्यात सापडले आहेत. राज्यातील जवळपास 93 पोलिसांना कोरोना झालेला आहे.   


लॉकडाऊन नाही मात्र कडक निर्बंध


दरम्यान राज्यात लॉकडाऊन लागणार नाही. मात्र नवी नियमावली आज रात्री किंवा उद्यापर्यंत जाहीर होईल. त्यानुसार निर्बंध आणखी कडक केले जाणार आहेत.