पालिकेच्या तीन नगरसेवकांचा जातीचा दाखला अवैध
3 नगरसेवकांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला.
मुंबई : भाजपाच्या नगरसेवकांना मोठा झटका बसला आहे. केशरबेन पटेल, मुरजी पटेल, राजपती यादव या 3 नगरसेवकांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला. भाजपाच्या चार आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा अर्ज अवैध ठरला होता. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. पण केशरबेन पटेल, मुरजी पटेल आणि राजपती यादव यांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. जात पडताळणी समितीने भाजपच्या चार आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता.
पालिका निवडणुकीत निवडून आल्यावर एका वर्षात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र हे प्रमाणपत्र सादर न झाल्याने ही कारवाई करण्यात आली होती. याविरोधात उच्च न्यायालयात या चारही नगरसेवकांनी धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने या चारही नगरसेवकांच्या याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे या नगरसेवकांचं पद धोक्यात आले आहे.
या नगरसेवकांचे पद रद्द झाल्यावर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना नगरसेवकपद मिळणार आहे. या तिघांचं पद रद्द झाल्यास एक जागा काँग्रेस आणि दोन जागा शिवसेनेच्या वाढणार आहेत. या सर्वात पालिकेत भाजपाला मोठा झटका लागला आहे. एकूण ५ नगरसेवक जात पडताळणीमुळे वादात होते. त्यापैकी ३ नगरसेवकांच्या याचिका फेटाळल्या. केशरबेन पटेल, मुरजी पटेल आणि राजपती यादव याच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. केसरबेन पटेल आणि मुरजी पटेल हे दाम्पत्य भाजपाचे नगरसेवक आणि राजपती यादव या काँग्रेसच्या नगरसेवकालाही याचा फटका बसला.
सेनेला फायदा
हायकोर्टाच्या निर्णयामुळे भाजपचे दोन नगरसेवक कमी होवून शिवसेनेचे दोन नगरसेवक वाढणार आहेत. काँग्रेसचा एक कमी होवून एक वाढणार आहे.
केशरबेन मुरजी पटेल यांच्याऐवजी दुसऱ्या क्रमांकावर असलेले नितिन बंडोपंत सलाग्रे, काँग्रेस तर मुरजी कानजी पटेल यांच्याऐवजी संदीप नाईक, शिवसेना यांचा नंबर लागणार आहे. केशरबेन व मुरजी हे पती पत्नी आहेत तर राजपती बरगून यादव, काँग्रेस ऐवजी शंकर हूंडारे, शिवसेना यांचा नंबर लागेल.