Mumbai News : रस्त्यावर स्टंट करणं हे जसं स्वतःसाठी जितकं धोकादायक असतं ते दुसऱ्यासाठी देखील धोकादायक ठरू शकतं. अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये स्टंट करताना अनेकांचा जीव गेला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणांकडून अनेकदा अशाप्रकारचे स्टंट केले जातात. मात्र हे सगळं करताना आजूबाजूच्या लोकांचा विचार केला जात नाही. असं काही घडताना दिसत असल्याच लोक ते आपल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड करत असतात. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडमुलाय. मुंबईतल्या एका जोडप्याचा स्कूटीवर बसून प्रवास करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र दोघांनी केलेल्या धक्कादायक प्रवासावरुन अनेकांनी टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये मुंबईतल्या रस्त्यांवर एक मुलगा आणि मुलगी स्कूटीवर बसलेले दिसत आहेत. पण दोघेही जरा फिल्मी स्टाईलमध्ये बसले आहेत. मुलगा स्कूटी चालवत आहेत आणि मुलगी समोर बसून मुलाला मिठी मारत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवत या जोडप्याने थंडीत स्कूटीवरुन धोकादायक प्रवास केला आहे.


मुंबईतील हे जोडपे वेगवान स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. ही क्लिप वांद्रे रेक्लेमेशन परिसरात एका व्यक्तीने रेकॉर्ड केली आहे. ही पोस्ट बांद्रा बझने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये स्कूटीवर तरुणी तिच्या मित्रासमोर बसली आहे. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि व्हिडिओच्या शेवटी कॅमेराकडे बघून हसतात. भररस्त्यावर दोघेही हेल्मेटशिवाय एकत्र बसले होते. तसेच त्यांनी स्वतःभोवती चादर देखील गुंडाळली होती.


व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी या दोघांवर त्यांच्या बेजबाबदार आणि अश्लील वर्तनाबद्दल टीका केली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, हे जोडपे वांद्रे रेक्लेमेशनमध्ये त्यांच्या स्कूटीवरुन सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसले. मुंबई पोलीस रस्त्यावरील प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही याकडे तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. मुंबई वाहतूक पोलिसांना या जोडप्यावर कारवाई करावी, असे म्हटलं आहे.



दरम्यान, या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. एका युजरने, हे धाडस नाही, हा अत्यंत मूर्खपणा आहे, असं म्हटलं आहे. दुसऱ्या एका युजरने ट्रॅफिक उल्लंघन करणाऱ्यांच्या तक्रारींचा विचार करणाऱ्या कोणत्याही अॅपबद्दल मला सांगा, असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने, रस्त्यांवर अनेक कॅमेरे बसवले आहेत, तरी ट्रॅफिक पोलीस कोणतीही कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला आहे.