अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : आईची हत्या करुन 22 वर्षीय मुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या मुलुंडमध्ये ही घटना घडली आहे. छाया महेश पांचाळ असं 46 वर्षीय मयत महिलेचं नाव असून तिची हत्या तिचाच 22 वर्षीय मुलगा जय याने केली आहे .मुलुंड च्या वर्धमाननगरमध्ये पांचाळ कुटुंबीय रहातात. काल संध्याकाळी मुलुंड पोलिसांना पांचाळ यांच्या घरातून रक्त येत असल्याचा कॉल आला.


मुलुंड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घर उघडून पाहताच घरात छाया पांचाळ रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता. पोलिसांना एक गुजराती भाषेत चिट्ठी देखील आढळली. जी छाया यांचा मुलगा जय याने लिहिली होती.


यात त्याने आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर मुलाने मुलुंड रेल्वे स्थानकात लोकल खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा तरुण लोकल खालीउडी मारत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागलं आहे


वडिलोपार्जित प्रॉपर्टी वरून हे दोघे माता पुत्र डिप्रेशन मध्ये असल्याचं छाया यांच्या पतीने पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.