मुंबई : राज्याचे माजी शिक्षणमंत्री आणि भाजपचे आमदार आशिष शेलार (Bjp Mla Ashish Shelar) यांना धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) ही कारवाई केली आहे. ओसामा शमशेर खानं असं अटक करण्यात आलेल्या या आरोपीचं नाव आहे. माजी शिक्षणमंत्र्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी या व्यक्तीने दिली होती. (mumbai crime branch arrests man for threatening bandra west assembly constituency mla and former education minister ashish shelar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिष शेलार यांनी याप्रकरणी पत्र लिहून पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. आशिष शेलार यांना यापूर्वी देखील अशी धमकी देण्यात आली होती. आशिष शेलार यांना  वारंवार येणाऱ्या धमक्यांबाबत पोलिसांनी गांभीर्यानं लक्ष घालावं अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) केली होती.


कोण आहेत आशिष शेलार?


आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. वांद्रे पश्चिम हा बॉलिवूड सेलिब्रेटी आणि हाय प्रोफाईल लोकांचा परिसर समजला जातो. आशिष शेलार या अशा हायफाय मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी फडणवीस सरकारमध्ये काही महिन्यांसाठी शिक्षणमंत्री पदाचा कारभार सांभळला होता. आशिष शेलार हे 2 वेळा नगरसेवकही राहिले आहेत.