Mumbai Crime : कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतलचे अन्...नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Mumbai Crime News : रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने चक्क पत्नीच्या अंगावर घासलेट टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 70 टक्के भाजली असून महिलेला मुंबईच्या जे जे रूग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नालासोपारा, प्रथमेथ तावडे : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील नालासोपाऱ्यामध्ये पत्नीला घासलेट टाकून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेत महिला 70 टक्के भाजली असून महिलेला मुंबईच्या जे जे रूग्णालयात (JJ Hospital, Mumbai) उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर तुळींज पोलिसांनी आरोप पती विरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.
नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर मधील शुभम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अनिता पांचाळ (Anita Panchal) (37) ही महिला पती संतोष पांचाळ (Santosh Panchal) याच्यासह रहात होती. तिला पहिल्या पतीपासून तीन मुले होते. या दोघांची दररोज भांडण होत होती. अनिशा पांचाळ यांना आरोपी पती संतोष पांचाळ याने घरातून बाहेर काढायचे होते. रोजच्या भांडणाला कंटाळून पत्नीला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने आरोपीने मंगळवारी (7 मार्च) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संतोष पांचाळ याने पत्नीवर रॉकेट ओतून तिला पेटवून दिले. या घटनेनंतर शेजार्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले असून ती महिला 70 टक्के भाजली आहे. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती संतोष पांचाळ याला तुळींज पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना
छत्तीसगडमधी बिलासपूर जिल्ह्यात पत्नीचा हत्या करून मृतदेहाच तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी पतीने मृतदेहाचे तुकडे पाण्याच्या टाकीत लपवून ठेवले होते. बनावट नोट छापल्याप्रकरणी तरुणाला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. साक्री पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उसलापूर येथे सती साहू वय वर्ष 28 हिच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवणे आणि बनावट नोटा छापल्याप्रकरणी पवन सिंह ठाकूर याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना पाण्याच्या टाकीतून पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या सतीच्या मृतदेहाचे पाच तुकडे सापडले.