Mumbai Crime News: आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, जिच्याजवळ सर्व गुन्हे माफ होतात ती म्हणजे आई. आपल्या मुलांसाठी आई कोणत्याही परिस्थितीला सामोर जाण्याची ताकद ठेवते. मात्र मुंबईतील (mumbai andheri crime) अंधेरी परिसरात माय लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 


मुलीवर दररोज अत्याचार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधरी परिसरात 16 वर्षीय मुलगी आईसोबत राहत होती. तिचा वडिलांचा अकाली निधन झाल्यानंतर या दोघीं एकमेकींचा आधार होता. लहानपणीत सुरुवातीला आईने घरकामात जुंपले होते. मात्र त्यानंतर आईने जून 2021 पासून स्वत: च्या मुलीला जनता फ्लोअर मिलमध्ये कामासाठी पाठवले. मात्र तेथे कामाऐवजी फ्लोअर मिलचा चक्कीवाला तिला एका खोलीत नेत तिच्यावर अत्याचार करु लागला. मुलीने त्याला विरोध केला पण ती त्याच्यापुढे असह्य झाली होती. तो तिली मारहाण करुन अत्याचार करत होता. यासाठी तो चक्कीवाला तिला प्रत्येकवेळी हजार रुपये देत होता. त्यानंतर मुलीने याघटनेबाबत स्वत:च्या आईला सर्वकाही सांगून टाकले. त्यावर तिच्या आईने जे उत्तर दिले, ते ऐकून मुलीला धक्काच बसला. 


आईने तिच्यावर आणला दबाव


'तुझं ते काम आहे ते तुला करायचे', असं म्हणत आईने देखील तिच्यावर दबाव आणला. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2022 पर्यंत मुलीवर अत्याचार सुरु होते. वासनाधीन व्यक्तीला विकृतीला कंटाळून अखेर मुलीने पोलिसांत धाव घेतली. मुलीच्या अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. 


ती मुलगी मानतिक धक्क्यात 


या घटनेमुळे ती मुलगी मानसिक धक्क्यात असून पोलिसांकडून तिच्याव समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच, अन्य कुठल्या व्यक्तीसोबतही तिला शारीरिक संबंधासाठी दबाव आणला होता का? याबाबतही पोलिस चौकशी करत आहे.  या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ 40 वर्षीय आईसह अत्याचार करणाऱ्या चक्कीवाला विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अटकेच्या वृत्ताला डी.एन.नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षत मिलिंद कुर्डे यांनी दुजोरा देत अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले आहे.