गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : धक्कादायक बातमी मुंबईतल्या बोरीवलीमधून (Borivali). बोरीवलीमध्ये डान्सबारमधली (Dance Bar) छमछम सुरूच आहे, असं दिसतंय. मनसे (MNS) नेते नयन कदम यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओच (Video) ट्विट केलाय. आणि या डान्सबारसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सवालही विचारलाय. डान्स बारचा हा व्हिडिओ समोर आल्यानं पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत बारमध्ये मुलींना नाचवणे आणि त्यांच्यावर पैशाची उधळण करणे या गोष्टींना कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र मुंबईच्या कस्तुरबा मार्गातील पार्कसाईट 14 ते 15 बार अवैधपणे पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असल्याचा मनसे नेते नयन कदम यांचा आरोप आहे. या व्हिडिओमध्ये दारू पिऊन झिंगलेले काही तरुण नृत्य करणाऱ्या मुलींवर पैशाची उधळण करत असल्याचं दिसतंय.



एकनाथ शिंदेंनी ठाण्यात तेरा बार तोडले आता आम्हीही बोरिवलीत बार तोडावेत का?, असा सवाल नयन कदम यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.