Mumbai Crime : मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आलेल्या एका हत्याकांडाने लालबागमध्ये (lalbaugh) खळबळ उडाली आहे. 23 वर्षीय मुलीने आपल्या जन्मदात्या आईचीच निर्घृणपणे हत्या (daughter arrested for killing mother) केल्याची माहिती समोर आली आहे. लालबागसारख्या परिसरामध्ये ही घटना घडल्याने नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जवळपास तीन महिन्यांपासून ही महिला कोणालाच दिसली नव्हती. त्यानंतर मंगळवारी या महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांपूर्वी लालबागमधील पेरू कंपाउंड परिसरातील एका इमारतीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेला वीणा प्रकाश जैन यांचा मृजदेह सापडला होता. लालबागच्या गॅस कंपनी लेन येथील इब्राहिम कासीम चाळीत वीणा जैन आणि त्यांची मुलगी रिंपल गेल्या 18 वर्षांपासून राहत होत्या.  रिंपलच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले खभालहोते. त्यामुळे वीणा जैन यांचा भाऊ दोघांचीही सांभाळ करत होता. रिंपलचा मामा तिला पैसे देण्यासाठी पेरु कंपाउंडमधील घरी देखील यायचा. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून वीणा जैन कोणाच्याही संपर्कात नव्हत्या. त्यांचे नातेवाईक त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचे मात्र रिंपल आई घरात नाही, झोपली आहे अशी उत्तरे देऊन त्यांना टाळायची. शेजारच्यांनीही वीणा जैन यांना गेल्या अनेक दिवसांपासून पाहिले नव्हते. 


मंगळावारी पैसे देण्यासाठी रिंपलची मामेबहिण तिच्या घरी गेली होती. त्यावेळी तिने रिंपलकडे वीणा जैन यांच्याबाबत चौकशी केली. मात्र रिंपलने आई कानपूरला गेली असून, तिचा संपर्क होत नसल्याचे सांगितले. रिंपलने अर्धाच दरवाजा उघडून पैसे घेतले आणि बंद केला. रिंपलच्या मामेबहिणीने हा सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून भेट न झाल्याने वीणा यांचे भाऊ सुरेशकुमार पोरवाल यांनी बहीण बेपत्ता असल्याची तक्रार मंगळवारी काळाचौकी पोलीस ठाण्यात दाखल केली. यानंतर पोलिसांसह वीणा जैन यांच्या नातेवाईक त्यांच्या घरी पोहोचले.


काळाचौकी पोलिसांनी दरवाजा उघडायला सांगितल्या नंतरही रिंपलेने आई झोपली आहे सांगत दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तपास केला असता वीणा यांचे धड प्लास्टिकच्या पिशवीत आणि कुजलेल्या स्थितीतील हात व पाय स्टीलच्या टाकीमध्ये सापडले. हा सर्व प्रकार पाहून सर्वांना धक्का बसला. पोलिसांनी तात्काळ रिंपलाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी या प्रकरणी तिला अटक केली आहे.


पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार किरकोळ वादातून हत्या केल्याची समोर आले आहे. हत्येनंतर इलेक्ट्रिक मार्बल कटर आणि कोयता आणि सुरीच्या  सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी घरातून शरीराच्या तुकड्यांसह इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि सुरी देखील जप्त केली आहे. वीणा आणि रिंपल जैन यांच्यामध्ये कोणत्या कारणावरून वाद होता का याचा तपास  सध्या काळाचौकी पोलीस तपास करत आहेत.