Mumbai Special 26 : मुंबईतला सर्वात मोठा सराफा बाजार (Bullion Market)म्हणजे झवेरी बाजार (Zaveri Bazar). देशाला पुरवठा होणाऱ्या 60-70 टक्के सोने चांदीची उलाढाल याच बाजारातून होते. हा बाजार मुंबईची ओळख आहे. याच झवेरी बाजारात तोतया ईडी अधिकारी (Fake ED Officer) बनून मोठा दरोडा टाकण्यात आला. चोर स्वत:च इनकम टॅक्सचे अधिकारी बनून येतात, घाबरवतात, छापा टाकतात आणि राजरोस दुकान लुटून जातात. अभिनेता अक्षय कुमारच्या स्पेशल 26 सिनेमाची (Special 26) ही रील स्टोरी आज जशीच्या तशी झवेरी बाजारात पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हातात बॅगा घेऊन काही माणसं झवेरी बाजारात आली. मुंबईच्या झवेरी बाजारात त्यांनी एका दुकानाची आधीच रेकी करुन ठेवली होती. प्लॅन ठरला आणि तडफदारपणे ईडी अधिकारी बनून हे सराईत चोर एका सराफा दुकानात धडकले. ईडी अधिकारी असल्याची बतावणी दुकानाची झाडाझडती घेतली. सगळं काही खरं भासावं म्हणून त्यांनी दुकानातल्या कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या.  ईडीची धाड पडली म्हणून व्यापारीही चिडीचूप होते. अवघ्या काही मिनिटात या टोळीनं 25 लाखांची रोकड आणि 1 कोटी 70 लाख किंमतीचं 3 किलो सोनं जप्त केलं. कोट्यवधींचं सोनं आणि कॅश घेऊन हे तोतया ईडी अधिकारी काही मिनिटात फरार झाले.


मुंबईची ओळख असणाऱ्या झवेरी बाजारात आजवर अशी चोरी कधीच झाली नव्हती. स्पेशल 26 स्टाईल चोरीमुळे पोलिसही हादरलेत.. या गँगच्या तीन चोरट्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी मुंबईतल्या व्यापारी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपी मोहम्मद फझल, समीर उर्फ मोहम्मद रझिक अहमद आणि विशाखा मुधोळ या तिघांना अटक केली आहे. विशाखा मुधोळ या महिलेवर याआधी चेक बाऊन्सची केस आहे. 


पोलिसांकडून अडीच किलो सोनं जप्त
पोलिसांनी या आरोपींकडून आतापर्यंत अडीच किलो सोनं आणि 15 लाख रुपये जप्त केले आहेत. या गुन्हात एकूण सहा जण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तीन जणांना अटक केली असून तीन जणांचा शोध पोलीस घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 



कशी होते ईडी कारवाई
ईडी एखाद्या ठिकाणी छापेमारी करतं तेव्हा त्यांची एक विशिष्ठ पद्धत असते. कारवाई सुरु असताना त्यांच्या बरोबर पंच असतात. जप्त केलेल्या वस्तूंचा सीझर मेमो बनवून संबंधीत व्यक्तीला दिला जातो. संशया आला तर पोलिसांना संपर्क करु शकता तसंच छापेमारीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे सर्च वॉरंट आणि आयडी कार्ड पाहण्याची विनंती केली जाऊ शकते.