मुंबई :  अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Gangster Chhota Rajan)याचा मुंबईत (Mumbai) वाढदिवस साजरा करण्यात आला. राजनच्या वाढदिवसानिमित्त मालाडमध्ये कबड्डी स्पर्धेचं (Kabaddi Competition) आयोजन करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टरही (Poster) लावण्यात आले. मात्र, हा वाढदिवस साजरा करणं चांगलंच महागात पडलं. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय. नंतर पोलिसांनी शुभेच्छा देणारे पोस्टरही काढून टाकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत लावण्यात आलेलं या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात छोटा राजनचा फोटो दिसतो. छोटा राजन उर्फ नाना यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य कबड्डी स्पर्धा असं या पोस्टरवर लिहिण्या आलं आहे. 14 आणि 15 जानेवारीला यानिमित्ताने कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पोस्टर हटवलं.


सीआर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यकडून ही पोस्टर लावण्यात आले होते. मालाडच्या तानाजी नगरमधल्या गणेश मैदान कुरार व्हिलेज इथं कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 


कोण आहे छोटा राजन?
2015 मध्ये छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यात आली त्यानंतर त्याला भारताकडे सुपूर्द करण्यात आलं. 55 वर्षीय छोटा राजन हा भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी (Most Wanted Criminal) एक आहे. दोन दशकांपासून तो सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देत होता. छोटा राजनचं खरं नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असं आहे. 


छोटा राजन हा मुळचा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा. पण मुंबईतल्या चेंबूरमधल्या टिळकनगर इथे लहानाचा मोठा झाला, चेंबुरमधल्याच सहकार सिनेमाबाहेर त्याने ब्लॅकने तिकिटं विकायला सुरवात केली. छोटे मोठे गुन्हे करत असताना तो बडा राजनच्या (Bada Rajan) संपर्कात आला. इथूनच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी सुरु झाली. बडा राजनच्या आशिर्वादाने धमकी, खंडणी, मारामारी असे गुन्हे तो करु लागला. 1980 मध्ये तो हत्येच्या सुपाऱ्या आणि सोन्याची तस्करी करु लागला.


बडा राजनची हत्या झाल्यानंतर छोटा राजन दाऊच्या (Dawood Ibrahim) संपर्कात आला. अगदी थोड्याच कालावधीत तो दाऊदच्या जवळचा माणूस झाला. मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर छोटा राजन आणि दाऊ यांच्यात ठिणगी पडली. त्यानंतर दाऊद आणि छोटा शकीलने जवळपास तीन वेळा छोटा राजनला संपवण्याचा प्रयत्न केला. 2002 मध्ये बँकॉकमध्ये छोटा राजनवर जीवघेणा हल्ला केला. पत्रकार जे डे यांच्या हत्येचा आरोप छोटा राजनवर आहे.