Kalyan Crime news : सुरक्षा करणारी महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत सोशल मीडियामुळे शिकार झाली आहे. सोशल मीडियावर अनोळखी माणसाशी जवळ जाऊन नका हे वारंवार आपल्याला सांगितलं जातं. सोशल मीडियावरुन अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. तरीदेखील एवढी मोठी चूक महिला पोलीस पोलीस कॉन्स्टेबलकडून झाली आहे. (Mumbai Crime News)


इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणमधील 30 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलने सोशल मीडियावर (Social Media) अनोळखी तरुणाशी मैत्री केली. संवाद सुरु झाला, मैत्री रंगत गेली. तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून तरुणाने महिला पोलिसाला आपल्या प्रेम जाळ्यात अडकवलं. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाने अनेक वेळा महिला पोलिसासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्यानंतर तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. महिला प्रेमात होती त्याचा मनातही नव्हतं ही मैत्री आपल्या आयुष्यासाठी शिक्षा ठरणार आहे.


मात्र एक दिवस तो तरुण थेट महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या घरी पोहोचला. त्या तरुणाने कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून महिला पोलीस कॉन्स्टेबलला दिलं. त्यानंतर तिच्यासोबत बलात्कार केला. या घटनेच्या खुलासानंतर पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे.   


आकाश जयधर घुले असं या तरुणाचं नाव आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबलने कल्याण पोलिसांकडे या तरुणाची तक्रार दाखल केली आहे. त्याचा विरोधात कलम 376, 328 आणि अनुसूचित जाती जमाती कलम 3 (2) अ. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कशी झाली इन्स्टाग्राम ओळख?


महिला कॉन्स्टेबलने सांगितलं की, इंस्टाग्रामवर आकाश जयधर घुलं या तरुणाशी ओळख झाली. त्याने आपण आर्मीत असून पुण्यातील खडकीमधील बॉम्बे इंजिनीयर ग्रुपमध्ये डी.आय प्रशिक्षक आहे असं त्याने सांगितलं. त्यानंतर आमची ओळख वाढू लागली. मेसेजमधून बोलता बोलता आम्ही फोनवर बोलायला लागलो. एक दिवस त्याने फोनवर माझी जात विचारली असताना मी त्याला सांगितली. 


मग त्याने भेटण्याची इच्छा व्यक्ती केली. मीही प्रेमात असल्याने त्याला होकार दिला. 08 मे 2022 रोजी तो मला माझ्या रुमवर कल्याणमध्ये भेटायला आला. त्यावेळी तो तीन दिवस माझ्यासोबत राहिला आणि नंतर त्याचा घरी निघून गेला. त्यानंतर तीन चार दिवसांनी तो परत रुमवर आला. त्यावेळीही तो 8 दिवस यावेळी कल्याणमधील घरी माझ्यासोबत मुक्काम केला.  (Mumbai Crime News police woman sexually assaulted woman boy friendship love on instagram )


त्या दिवसामध्ये एका दिवशी रात्री त्याने थंड पेयामधून गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर माझ्या इच्छेविरोध त्याने बळजबरीने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मी त्याला बोलले तू माझं आयुष्य खराब केले. त्यावर आपण लग्न करणार आहोत, मग आयुष्य खराब कसं होणार. मी त्याचा या बोलण्यावर भाळल्या गेली. त्यानंतर आमच्यामध्ये अनेक वेळा लैगिंक संबंध प्रस्थापित झाले. त्याच्या गोड बोलण्यावर मी विश्वास ठेवला. 


त्यानंतर अनेक महिने गेले एक दिवस म्हणजे 12 मे 2023 त्याचा त्या चुलत भावाने फोन करुन लग्न ठरलंय. मला धक्का बसला, मी लगेचच आकाशाला फोन करुन विचारणा केली. त्यावेळी त्याने मी मुलगी पाहिलेली नाही. समोरुनच मुलींकडून लग्नाचा प्रस्ताव येतो आहे. पण मला शंका आली आणि मी त्याचा गावाला भेटायला गेली. 


त्याला म्हटलं तुझ्या आई वडिलांना भेटायचं आहे तर त्याने थेट नकार दिला आणि तो तिथून निघून गेला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे. पोलिसांच्या मदतीने आकाश आणि त्याचा वडिलांना मी भेटली असता. आकाशने लग्नाचं वचन दिलं होतं आणि आता तो नकार देत असल्याचं त्याचा वडिलांना सांगितले. त्यावेळी आपली जात वेगळी असल्याने त्याने परत लग्नाला नकार दिला.