मुंबईतल्या दहिसरमध्ये रिव्हर मार्चचं आयोजन
नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मुंबईतल्या दहिसरमध्ये रिव्हर मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं.
मुंबई : नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मुंबईतल्या दहिसरमध्ये रिव्हर मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला मुख्यमंत्राच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप आमदार राम कदम, अभिनेता सुमित राघवन उपस्थित होते. दहिसर, पोइसर, ओशिवरा नदी या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्यात.
जनजागृतीसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू
या नद्यांची स्वच्छता आणि जनजागृतीसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. या रॅलीच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी नद्यांची निगा राखण्याचे आवाहन केलं.
मुख्यमंत्र्यांनी रॅलीला उपस्थित राहणं टाळल्याची चर्चा
नद्यांच्या मुद्यावरुन सुरु असलेले राजकारण काँग्रेसनं थांबवून नद्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला राम कदम यांनी दिलाय. दरम्यान रिव्हर साँग वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या रिव्हर रॅलीला उपस्थित राहणं टाळल्याची चर्चा होती. मात्र या रॅलीला उपस्थितच राहणार नव्हतो असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय.