Theft Avoided Becaused Of Cat: घरच्या पाळीव प्राण्यांना आपण निस्वार्थीपणे जीव लावतो. त्यामुळे हेच प्राणी त्याची कधी परतफेड करतील सांगता येत नाही. मुंबईत एका प्रसिद्ध दिग्दर्शिकेच्या घरी होणारी संभाव्य चोरी टळली.  घरी पाळलेल्या बोक्याने कमाल केली आणि चोर पळून गेला. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर बोक्याचे सगळीकडून कौतुक होतंय. काय घडली होती ही घटना? चोर कसा ऐटीत आला? आणि काहीच चोरी न करता कसा गुडूप झाला? हे सर्व जाणून घेऊया.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या अंधेरीत फसलेल्या चोरीचा एक विचित्र प्रकार समोर आलाय.बिल्डिंगमधील पाईपवरुन चढून चोर सहाव्या माळ्यावर राहणाऱ्या दिग्दर्शिकेच्या फ्लॅटमध्ये शिरला. मध्यरात्र असल्याने घरी सर्व झोपले होते. पण पाळलेला बोका मात्र जागा होता. त्याने प्रसंगावधन दाखवलं आणि मोठी चोरी टळली. 


काय आहे संपूर्ण प्रकरण?



या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये चोर फ्लॅटच्या हॉलमध्ये आलेला दिसतोय. पुढे स्वप्ना जोशींच्या बेडरुमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.  स्वप्ना जोशींची आई बेडवर झोपली होती तर केअर टेकर खाली जमिनीवर झोपली होती. एकदा चोर दरवाजा उघडतो तेव्हा प्रकाश डोळ्यावर येऊन केअरटेकरला जाग येते. पण चोर दरवाजा बंद करतो. काही करुन बेडरुममध्ये घुसावे यासाठी तो पुन्हा दरवाजा उघडतो. 


डारेक्टरच्या जावयाला आली जाग 


जसे मांजर स्वप्ना यांचे जावई आणि मुलगी राहत असलेल्या रुममध्ये आला तसे त्यांच्या जावयाला जाग आली. त्याने चोर चोर म्हणून ओरडायला सुरुवात गेला. यानंतर पाठलाग करुन चोराला पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.