मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ड्रग्स प्रकरणात (Mumbai Drugs Case)  अटकेत असलेल्या आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालायने फेटाळून लावला. आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे एनसीबीने आर्यनचा आणखी एक मित्र श्रेयस नायरला (Shreyas Nair) अटक केली आहे. 


कोण आहे श्रेयस नायर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहिती नुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि श्रेयस नायर शाळेपासूनचे मित्र आहेत. आर्यन खान आणि अरबाज मर्चंटच्या मोबाईल चॅट्समध्ये श्रेयसचं नाव समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस नायरदेखील रेव्ह पार्टीला उपस्थित राहणार होता. पण काही कारणामुळे तो जाऊ शकला नाही. एनसीबीने रविवारी संध्याकाळी उशिरा श्रेयसला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याची अनेक तास चौकशीही करण्यात आली, त्यानंतर एनसीबीने आज श्रेयस नायरला अटक केली.


ड्रग्स पेडलरही एनसीबीच्या जाळ्यात


एनसीबीने एका हायप्रोफाईल ड्रग्स पेडलरलाही (Drug Paddler) अटक केली आहे. हा तोच ड्रग्स पेडरल आहे, ज्याने रेव्ह पार्टीला ड्रग्स पुरवली होती. त्याच्याकडून एमडीएमए गोळ्या आणि मेफाड्रोन देखील जप्त करण्यात आले आहेत. हा ड्रग्स पेडलर ड्रग्सच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर घेण्यासाठी डार्कनेट (Darknet) वापरत असे आणि त्याचे पैसे बिटकॉईनमध्ये (Bitcoins) घेत असे.