आर्यन खान आज जेलबाहेर, ड्रॉप बॉक्समधून जामीन अर्ज काढला
Aryan Khan Drugs Case : अभिनेता शाहरूख खान याचा मुलागा आर्यन खान हा आज आर्थर रोड जेलबाहेर येणार आहे.
मुंबई : Aryan Khan Drugs Case : अभिनेता शाहरूख खान याचा मुलागा आर्यन खान हा आज आर्थर रोड जेलबाहेर येणार आहे. दरम्यान, पहाटे ड्रॉप बॉक्समधून जामीन अर्ज बाहेर काढले गेले आहेत. त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Aryan Khan Gets Bail) आर्यनचा जामीन अर्जही जेल प्रशासनाकडे देण्यात आला आहे. आता आर्यनच्या अर्जावर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे तो जेलबाहेर पडणार आहे.
तब्बल 26 दिवसांनंतर आर्यन शाहरूख खान आज जेलबाहेर येणार आहे. आर्यनला मुंबई उच्च न्यायालयात परवा जामीन मंजूर झाल्यावर आज अखेर तो जेलबाहेर येणार आहे. आज पहाटे आर्थर रोड कारागृहाची जामीन पेटी उघडण्यात आली. त्या पेटीत आर्यन खानचा अर्जही होता. त्यावर आज जेल प्रशासनाची कारवाई सुरू झाली आहे. थोड्याच वेळात आर्यन खान जेलबाहेर येईल.
एनसीबीने केलेल्या (NCB) कारवाईत शाहरुख याचा मुलगा, आर्यन खान याच्यापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या. जवळपास 25 दिवसांनंतर आर्यनला अखेर जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाकडून बऱ्याच युक्तीवादानंतर देण्यात आलेला हा निकाल शाहरुखला मोठा दिलासा देणारा ठरला. निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आर्यन खान याच्या जामीनची ऑर्डर सत्र न्यायालयात पोहोचली आणि त्याच्या वाटा मोकळ्या झाल्या.
अभिनेत्री जुही चावला हिने हमीदार होत आर्यनच्या जामीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयानेही ही बाब मंजूर केली होती. पण, अखेर आर्यनची काल सुटका झाली नाही. दरम्यान, मुलाला घेण्यासाठी खुद्द शाहरुख खान आर्थर रोड कारागृह परिसरात पोहोचल्याचे सांगितले गेले. पण, जामिनाची प्रत कारागृहातील पेटीत निर्धारित वेळमर्यादेत न पोहोचल्यामुळे आर्यनची सुटका लांबली होती. कारण जामीन अर्जाची प्रत पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे त्याची कालची एक रात्र कारागृहातच गेली.