Mumbai Drugs Case  : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते  (NCP) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत मुंबई ड्रग्स पार्टीत एका दाढीवाल्याचा उल्लेख केला होता. दाढीवाला असणारा हा मोठा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया असून तो समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा मित्र असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. (Nawab Malik on Mumbai Drugs Case - Who International Drug Mafia ?)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काशिफ खान असं या दाढीवाल्या व्यक्तीचं नाव आहे. तो फॅशन टीव्हीचा MD आहे. काशिफची प्रेयसीही या पार्टीत होती. काशिफ खानला अटक का केली नाही असाही सवाल मलिकांनी उपस्थित केला होता.



नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर


मलिक यांनी आरोप केल्यानंतर आता तो दाढीवाला म्हणजे फॅशन टीव्हीचे MD काशिफ खान यांनी समोर येत आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मी कोणतीही पार्टी आयोजित केली नव्हती, एका दिल्लीतल्या कंपनीने ही पार्टी आयोजित केली होती. दूरदूरपर्यंत या आयोजनाशी माझा संबध नाही. नवाब मलिक यांनी माझं नाव का घेतलं, हे मला कळत नाही. मी त्यांना ओळखत नाही, नाही माझे त्यांच्याशी कोणते व्यवहार आहेत, असं काशिफ खान यांनी म्हटलं आहे.


पार्टी आयोजित केली नव्हती


क्रूझवर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी झाल्याचं काशिफ खान याने कबुल केलं आहे. पण पार्टीसाठी मी स्वत: तिकिट विकत घेतलं होतं, याचे सर्व पुरावे माझ्या जवळ आहेत, मी क्रुझ पार्टीत एक कस्टमर म्हणून गेलो होतो, असं काशिफ खान यांनी स्पष्ट केलं आहे. नवाब मलिक हे एक मोठे मंत्री आहेत, पण आरोप करण्यापूर्वी नवाब मलिक यांनी सत्य जाणून घ्यायला हवं होतं, असं काशिफ खान यांनी म्हटलं आहे. 


आर्यन आणि वानखेडेंना ओळखत नाही


पार्टीत आर्यन खानला पाहिलं नाही, आणि मी त्याला ओळखतही नाही, तसंच समीर वानखेडे यांनाही यापूर्वी आपण कधी भेटलो नव्हतं, त्यांच्याशी कोणतंही बोलणं झालं नव्हतं, याप्रकरणी कोणत्याही तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरं जायचं असेल तर आपण तयार आहोत, असंही काशिफ खान यांनी सांगितलं.