मुंबई : Mumbai Drugs Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर ( Aryan Khan Drugs Case) सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले. ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेली एनसीबीच्या कारवाई एक षडयंत्र होते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. यामागे भाजपचा हात होता, असा थेट आरोप मलिक यांनी केला होता. त्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. दिवाळीनंतर मीच मोठा बॉम्ब फोडणार, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी केला होता. (Mumbai Drugs Case - Nawab Malik Vs Devendra Fadnavis)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून केल्या जाणाऱ्या अनेक कारवाया बोगस आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे खंडणी वसुलीसाठी खोटी प्रकरणे तयार करतात आणि मोठ्या घरातील लोकांना अडकवतात. त्यांना भारतीय जनता पक्षाचे काही लोक सामील आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. 


या आरोपानंतर गेल्या महिनाभरात मलिक यांनी मीडियाच्या माध्यमातून अनेक पुरावेही सादर केले होते. त्यानंतर एनसीबीने समीर वानखेडे यांच्याकडून सहा प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला. तसेच नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचेही ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा आरोप केला होता. हे आरोप फडणवीस यांनी आधीच फेटाळले होते. उलट नवाब मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, असे सांगत त्यांनी मलिक यांच्या विरोधात पुरावे जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. तर, नवाब मलिक यांनीही फडणवीसांचे आव्हान स्वीकारलं होते.