Dussehara Melava 2022 : शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात यंदा दसरा मेळावा (Dussehara Melava) घेण्यासाठी कोणालाच परवानगी न  मिळण्याची शक्यता आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाने (Shinde Group) मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. पण दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट  (Thackeray Group) आणि शिंदे गटापैकी (Shinde Group) कुणालाच परवानगी मिळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) विधी आणि न्याय खात्याचा अहवाल समोर आली आहे. खरी शिवसेना (Shivsena) कुणाची, वाद कोर्टात प्रलंबित आहे.  कुणाचा अर्ज अधिकृत हे विधी विभाग ठरवू शकत नाही, त्यामुळं कोणत्याही गटाला परवागनी देऊ नये अशी महापालिकेची भूमिका आहे.


विधी व न्याय विभागाचा अहवाल
विधी आणि न्याय विभागाच्या अहवालात खरी शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोणत्या गटाच्या अर्जाला परवानगी द्यायची, हा प्रश्न आहे. मुंबई महापालिका याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. दरवर्षी दसरा मेळव्यासाठी शिवसेनेचा अर्ज येतो. पण यावेळी कोणता अर्ज अधिकृत आहे हे विधी विभाग ठरवू शकत नाही. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी कुणालाचा परवानगी देऊ नये, असं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे.


शिवसैनिकांची आक्रमक भूमिका
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या शिष्टमंडळानं जी/नॉर्थ पालिका वॉर्ड ऑफिसवर आज धडक दिली. वॉर्ड ऑफिसर प्रशांत सपकाळे यांची भेट घेऊन शिवसैनिकांना त्यांना जाब विचारला. महिना उलटला तरी शिवसेनेला परवानगी मिळत नाही. सरकारची दडपशाही सुरू असल्याचा आरोप वैद्य यांनी यावेळी केला. परवानगी मिळाली नाही तरी शिवाजी पार्कवरच ठाकरे गटाचा मेळावा होणार, असा दावाही त्यांनी केला.


शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार
शिंदे गटाला BKC मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी MMRDA कडून परवानगी देण्यात आलीय. पण, ठाकरे गटाला परवानगी MMRDA ने नाकारल्याने दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला इतर पर्यायी जागांचा आता विचार करावा लागणाराय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडून अर्ज करून एक महिना होत आलं असला तरी मुंबई महापालिकेने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही.