म्हणून एल्फिन्स्टनच्या पुलाचं उदघाटन झालं नाही
एल्फिन्स्टन इथे रेल्वेने बांधलेल्या पादचारी पुलाचं काम पूर्ण झालंय.
मुंबई : एल्फिन्स्टन इथे रेल्वेने बांधलेल्या पादचारी पुलाचं काम पूर्ण झालंय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते पुलाचं उदघाटन होणार होतं. मात्र अंधेरी अपघातामुळे आज उदघाटन झालं नाही. लवकरच हा पूल प्रवाश्यांसाठी खुला होणार आहे. काही महिन्या पूर्वी लष्करा मार्फ़त तयार करण्यात आलेला पूल सुरू झाला आहे. आता रेल्वे मार्फ़त तयार करण्यात आलेला एल्फिन्स्टन परळ ला जोडणारा पूल ही पूर्ण झालाय. या नवीन पादचारी पुला मुळे एल्फिन्स्टन-परळ स्थानकातील वाढत्या गर्दीवर मोठा दिलासा मिळणार आहे.
मंगळवारी सकाळी अंधेरी स्टेशनवरच्या पादचरी पूल कोसळला. या दुर्घटनेमुळे तब्बल १३ तास पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प होती. रुळांवरचा ढिगारा काढल्यानंतर आणि ओव्हरहेड वायरचं काम केल्यानंतर अंधेरीवरून चर्चगेटसाठी लोकल रवाना झाली.