मुंबई : पालक पनीरमध्ये मेलेली पाल चुकून खाल्यामुळे एका कुटूंबाला चांगलाच मनस्ताप भोगावा लागला. या कुटूंबातील ५ लोक या प्रकारानंत आजारी पडले. डॉक्टरांनी उपचार केल्यावर हे सर्व पीडितांची प्रकृती आता ठिक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रकार ज्या कुटूंबासोबत घडला त्यांच्या नात्यातील व्यक्तीचे निधन झाले होते.  व्यक्तीच्या निधनानंर करण्यात येणाऱ्या पूजेचा प्रसाद हे लोक खात होते. दरम्यान, त्यांना प्रसादात मेलेली पाल आढळली. जेवन झाल्यावर संपूर्ण कुटूंबाला त्रास होऊ लागला. त्यामुळे कुटूंबाला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितामध्ये दोन मुलांचा समावेश आहे. त्यापैकी एक १ वर्षाचा तर दुसरा ४ वर्षांचा आहे.


घटनेतील सर्व पीडितांना मुंबईतील डॉ. बाबासाहेब अबेडकर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्व लोकांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खोंडाबाई बनसोडे (५९), सुरेखा साळवी (२७) दिलीप (३५) , आणी दोन मुले सम्यक बनसोडे आणि साल्वी अशी पीडितांची नावे आहेत.