मुंबईतल्या गिरगावमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला, कामावर जात असताना अचानक आला आणि...
Mumbai : दक्षिण मुंबईतल्या एका तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Mumbai : दक्षिण मुंबईतल्या एका तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीडित तरुणी सकाळी कामासाठी जात होती. यावेळी हल्लेखोर तरुणाने अचानक तिच्यावर धारदार शस्त्राने (Attack) हल्ला केला. सुदैवाने स्थानिक लोकांनी सतर्कता दाखवत हल्लेखोर तरुणाला पकडलं, त्यामुळे सुदैवाने तरुणीचा जीव वाचला. याप्रकरणी व्ही पी रोड पोलीस (V P Road Police) अधिक तपास करत आहेत.