कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : काही घटना अतिशय दुर्मिळ, तेवढ्याच धक्कादायक असतात, ज्यावर विश्वास बसणे सहज शक्य होत नाही. मुंबईत सायन रुग्णालयात एक असंच पेशंट आलं. एका ९ वर्षाच्या मुलीच्या पोटात जन्मापासून अर्भक होतं. ही नऊ वर्षाची मुलगी जन्मापासूनच पोटात बाळ घेऊन जगत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जन्मापासून पोटात बाळ घेवून जगणाऱ्या एका ९ वर्षीय मुलीवर मुंबई महापालिकेच्या सायन रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलीय. बाळाच्या पोटात बाळ होण्याचे प्रकार अत्यंत दुर्मिळ असतो.  सायन हॉस्पिटलचे प्रसिद्ध पेडियाट्रिक सर्जन, डॉ.पारस कोठारी यांनी ही सर्जरी केली.


जन्मापासूनच तिच्या पोटात होते बाळ...



गेली ९ वर्षे ती पोटात बाळ घेवून जगत होती...अंधश्रद्धेला बळी पडून अनेक उपचार तिच्यावर केले...अखेर विज्ञानेच तिची या संकटातून सुटका केली. ९ वर्षीय मुलगी उत्तर प्रदेशातील खेड्यात राहते. 


लहानपणापासून तिच्या पोटात दुखायचं. या दुखण्याबरोबरच पोटात एक टणक गोळाही वय वाढेल तसा वाढू लागला. वेदना असह्य झाल्यानं अखेर तिच्या वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीनं तिला मुंबईत आणून सायन रूग्णालयात दाखल केले. 


अखेर निर्णय घेतला


डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तर डॉक्टरांना धक्का बसला, तिच्या पोटात वाढणारा तो गोळा नव्हता, तर ते चक्क बाळ होते. डोके, दोन डोळे,दोन हात, दोन पाय..कणा..हे अवयव होते, परंतु त्यात जीव नव्हता. 


जुळी बाळं होण्याऐवजी एका बाळाच्या पोटात गर्भ जाते आणि तिथं मोठे होवू लागतं, असं सायन हॉस्पिटलचे डॉ.पारस कोठारी यांनी म्हटलं आहे.


बाळाच्या पोटात बाळ असण्याच्या केसेस अत्यंत दुर्मिळ असतात आणि जरी समोर आल्या तर त्या पहिल्या चार पाच महिन्यांत समजून येतात. रोशनीलाही लहानपणापासून त्रास होत होता. परंतु तिचे कुटुंबिय अंधश्रद्धेला बळी पडले आणि भोंदूबाबांसारख्या लोकांकडे जात राहिले.


रोशनीवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर ती आता तिचे पुढील आयुष्य नॉर्मल जगू शकणार आहे, ते केवळ सायन रूग्णालयातील या पेडियाट्रिक सर्जरीच्या टिममुळे.