Mumbai Traffic Advisory: मुंबईतील `या` रस्त्यांवर आज No Entry; कोणते मार्ग वळवले? पाहा वाहतूक मार्गातील महत्त्वाचे बदल
Mumbai Traffic Advisory: मुंबईतील गणपतीच्या भव्य विसर्जन मिरवणुका पाहता शहरातील वाहतूक विभागाच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
Mumbai Traffic Advisory: 7 सप्टेंबरपासून सुरू झालेला गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) आता अंतिम टप्प्यामध्ये आला असून, अखेर गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस उजाडला आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी सध्या संपूर्ण शहर सज्ज झालं असून, इथं मंडळातील कार्यकर्त्यांचा जितका उत्साह आहे तितकाच किंबहुना त्याहूनही जास्त उत्साह शहरातील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. (Mumbai Ganesh Visarjan 2024)
एकिकडे विसर्जन मिरवणुका सुरू असतानाच दुसरीकडे मुंबई शहरात सुरू असणारी वाहतूक विनाव्यत्यय सुरू राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे निर्णय घेत काही मार्गांवर वाहतूक बंद ठेवली असून, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देत वाहतूक वळवण्यातही आली आहे. शिवाय नागरिकांना लोकल ट्रेन, बस अशा वाहतुकीच्या सार्वजनिक सुविधांचा वापर करत खासगी वाहनाचा वापर टाळण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.
वाहतुकीतील मोठे बदल...
- कोस्टल रोड (Coastal Road): मुंबईकरांचा प्रवास सुकर होण्यासाठी कोस्टल रोड 18 सप्टेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे.
- मरीन ड्राइव (Marine Drive): एन एस रोडच्या उत्तरेकडील वाहतूक गरज पडल्यास इस्लाम जिमखान्यावरून कोस्टल रोडमार्गे वळवण्यात येईल.
- ईस्टर्न फ्रीवे (Eastern Freeway): पी डी’मेलो रोड, CSMT जंक्शन, प्रिंसेस स्ट्रीट या मार्गांवर वाहतुकीचे कोणतेही निर्बंध नाहीत.
- दक्षिण मुंबईमध्ये नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे आणि रामभाऊ साळगावकर मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील.
हेसुद्धा वाचा : Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबाग- परळ, गिरगाव... मुंबईतील विसर्जन मिरवणुकांचे सर्व अपडेट एका क्लिकवर
- काळबादेवी क्षेत्र (Kalbadevi Area): जेएसएस रोड, विट्ठलभाई पटेल रोड, बाबा साहेब जयकर रोड, राजा राम मोहन रॉय रोड, कासवासजी पटेल टँक रोड, संत सेना मार्ग, नानूभाई देसाई रोड आणि सरदार वल्लभभाई पटेल रोडवर वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
- जुहू तारा रोड : सांताक्रू पोलीस स्टेशन जंक्शनहून वी हॉटेल जंक्शनपर्यंतचा मार्ग वाहतुकीस बंद असेल.
- मार्वे रोड जंक्शन: मलाड मार्वे रोड ते मीठचौकी पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल.
- गोखले ब्रिज: या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद असेल.
- महापालिका मार्ग: गरज भासल्यास CSMT जंक्शन ते मेट्रो जंक्शनपर्यंतचा रस्ता बंद करण्यात येणार असून, CSMT जंक्शन ते डीएन रोडवर वाहतूक वळवण्यात येईल.