शोकाकुल वातावरणात वैमानिक मारियाला अखेरचा निरोप
मारियाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
मुंबई : वैमानिक मारियाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिच्या राहत्या घरावरून तिचा मृतदेह अँम्ब्युलन्समधून नेण्यात आला. यावेळी खूपच शोकाकुल असं वातावरण होतं. कुटुंबियांना तिच्या अशा अचानक जाण्याने खूपच धक्का बसला. मारिया ही पहिली मुस्लिम पायलट होती. वातावरण चांगलं नसतांनाही उड्डाण भरायला लावलं याला कोण दोषी आहेत? याबाबत चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. ज्या कंपनीचं हे विमान होत त्यांनी अजूनही संपर्क केलेला नाही. कंपनीच्या मालकाने तसेच सरकारकडूनही तिच्या अपघाताची माहिती मिळाली नाही तर आम्हाला मीडियाकडून या दुर्घटनेची माहिती अशी प्रतिक्रीया मारियाचे काका जोहर खान यांनी मीडियाला दिली.