रायगड : रायगड जिल्‍हयातून जाणाऱ्या मुंबई - गोवा महामार्गाची पार दुरवस्‍था झाली आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात पळस्‍पे ते इंदापूर या 84 किलोमीटर रस्‍त्‍याच्‍या रूंदीकरणाचं काम 7 वर्षांपूर्वी हाती घेण्‍यात आलं मात्र अद्यापही ते पूर्ण झालेलं नाही. त्‍याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय . प्रवाशांना पाठीचे आणि मणक्‍याच्‍या आजारांना सामोरं जावं लागतंय .


गणेशोत्‍सवापूर्वी दुरूस्ती ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महामार्गावरील पूलांची कामं देखील अर्धवट स्थितीत आहेत . कोकण आणि गोव्‍यात जाण्‍यासाठी असणारया या मार्गाच्‍या कामावर आतापर्यंत करोडो रूपये खर्च झाले असले तरी प्रवाशांच्‍या नशिबी केवळ खड्डेच आहेत . त्‍यामुळे महामार्गावरील प्रवास नकोसा झालाय. 


गणेशोत्‍सवापूर्वी महामार्गाची दुरूस्‍ती करण्‍याचं आश्‍वासन सरकारनं दिलंय परंतु रस्‍त्‍याची सद्य स्थिती पाहता हे कितपत शक्‍य आहे याबददल शंकाच आहे .