मुंबई : लालबागचा राजा मंडळाची मुजोरी कमी करण्यासाठी अखेर राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. यापुढे लालबागचा राजा मंडळावर सरकारचं नियंत्रण असणार आहे. लागबागचा राजाचा कारभार पारदर्शक करण्यासाठी सरकार समितीची स्थापना करणार आहे. हीच समिती दर्शन रांगेबाबतही धोरण ठरवणार आहे.


धर्मदायाचा निर्णय अंतिम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सवाच्या आठ दिवस आधी समिती दर्शन रांगेबाबत धोरण ठरवणार . या समितीत पोलीस अधिकारी, धर्मादाय आयुक्त आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा या समितीत समावेश असणार आहे.


लालबागच्या चरणी अर्पण झालेला निधी, दागिने यांची मोजदाद धर्मदाय आयुक्तालयाच्या प्रतिनिधींसमोर होणार आहे.


तसंच लालबागचा राजाच्या दर्शनाबाबत काही वाद झाल्यास धर्मदाय आयुक्तालयाचा निर्णय अंतिम असणार आहे.


'...तर कारवाई होणार'


धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानुसार मंडळाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याना त्यांचा ओळखीच्या लोकांना रांगेतून सोडता येणार नाही.


तसा प्रयत्न झाल्यास कारवाई  करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत.