मुंबई: मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादण उडाली. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. अनेकांची घर उद्ध्वस्तही झाली. संसार उघड्यावर पडायची वेळ आली. मुंबईत कसं जगायचं याची धागधूग पुन्हा सुरू झाली. कारण दरवर्षी प्रमाणे पुन्हा एकदा मॅनहोलवर प्रश्न उपस्थित झाला. मुसळधार पावसात महिला मॅनहोलमध्ये पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरामध्ये दोन महिला मेनहोलमध्ये पडल्याचा प्रकार उघडकीस आला. मुसळधार पडलेल्या पावसामध्ये भांडुप व्हिलेज रोड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते या पाण्यातून 2 महिला रस्ता शोधत होत्या त्यावेळी अचानक या महिला एकामागोमाग एक या महिला मेन  हॉल मध्ये पडल्या.



ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पावसाचा जोर ओसरला होता त्यामुळे नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह हा कमी होता नाही तर या दोन्ही महिलांच्या जीवावर बेतलं असतं.