दादर स्टेशनच्या परिसरात फुल विक्रेत्यांना बसण्यास बंदीच
प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
मुंबई: दादर फुल मार्केटमध्ये फुल विक्रेत्या फेरीवाल्यांना मुंबई उच्च न्यायालयाने बसण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. याआधी रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर अंतरावर बसण्यास फेरीवाल्यांना न्यायालयाने मज्जाव केला होता. दादर आणि आसपासच्या परिसरात अनेक मंदिरे असल्याने दादर रेल्वे स्थानकाबाहेर किमान फुल विक्रेत्यांना परवानगी देण्याची मागणी बॉम्बे हाकर्स असोसिएशनने केली होती. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.