Anil Deshmukh's bail case : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांना भ्रष्टाचार प्रकरणी (Money Laundering) जामीन देण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने 27 डिसेंबर 2022 पर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे देशमुख यांना जामीन मिळूनही त्यांची सुटका झालेली नाही. (Money Laundering: Mumbai High Court extends stay on effect of order granting bail to NCP leader Anil Deshmukh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनी लॉड्रिंग प्रकरणी  (Money Laundering) देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. मात्र त्यांच्या जामिनावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) आक्षेप घेतला होता. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने  याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने जामीन देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. 



दरम्यान, अनिल देशमुख  Anil Deshmukh) यांना न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाच्या आदेशाला दिलेली स्थगितीची मुदत उद्या 22 डिसेंबर रोजी संपत होती. त्यामुळे स्थगितीच्या निर्णयाला 3 जानेवारी 2023पर्यंत मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी सीबीआयने (CBI) 
 पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एक खंडपीठाने देशमुख यांना जामीन मंजूर केल्याने त्यांच्यासमोरच मंगळवारी सीबीआयने प्रकरण सादर केले. तसेच देशमुख यांना जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगितीची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिलाय.


केंद्रीय अन्वेषण ब्युरोमार्फत चौकशी सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांना जामीन मिळालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) याप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायलयाने अनिल देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या एकल खंडपीठाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आता न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर केला होता.


गेल्या महिन्यात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन मागितला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात अखेर जामीन मिळाला होता. गेल्या महिन्यात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन मागितला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात अखेर जामीन मिळाला होता.