मुंबई : नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या सनबर्न फेस्टीव्हलला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील मिळाला आहे. नियमांचं पालन करा, सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोख लक्ष ठेवा, आवाजावर नियंत्रण ठेवा असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. 


कोर्टाने विचारले होते प्रश्न?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संगीत सोहळ्यात येणा-या लाखोंच्या गर्दीत किशोरवयीन मुला-मुलींना मद्य पिण्यापासून कसं रोखणार?, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्यात का? असे सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारले होते. 


आज दिली कोर्टात माहिती


त्याचबरोबर आयोजकांवर शेजारील राज्यात करचुकवेगिरीचे आरोप होत असताना महाराष्ट्र सरकार त्यांना इतक्या सहज परवानगी कशी देते? असा सवालही हायकोर्टानं विचारलं होतं. यासंदर्भात बुधवारपर्यंत म्हणजे आजपर्यंत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकार आणि आयोजकांना दिले होते. त्यानुसार दोघांनीही आपली बाजू मांडली.