मुंबई : मुंबईतील मेट्रो 3 चं काम मध्यरात्री करण्यास यापूर्वी हायकोर्टानं घातलेली बंदी आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आलीय. तसंच या प्रकल्पासाठी लागणा-या साहित्याची ने-आण करण्यासाठी अवजड वाहनं मुंबईत आणायलाही कोर्टानं परवानगी नाकारलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी मेट्रोच्या कामावर तिखट शब्दांत नाराजी व्यक्त केलीय. मेट्रो 3 चं काम रात्री सुरू असल्यानं ध्वनी प्रदूषण होतं, असा आक्षेप घेणारी याचिका न्यायालयात दाखल झालीय.


मुंबईत मेट्रोचं काम सुरु असताना कामगार जोरात ओरडत असतात. फोनवर मोठ्यानं गाणी ऐकत असतात. ते पाहून त्यांच्या कानशिलात मारावी असं वाटतं, असं मंजुला चेल्लूर म्हणाल्यात.