Bombay High Court Women Short Clothes Not Obscenity: महिलांनी छोटे कपडे घालून नाचणं म्हणजे अश्लिलता नाही असा निर्वाळा मुंबई हायकोर्टने दिला आहे. यामुळे कोणालाही त्रास होण्याचा प्रश्न येऊ शकत नाही असं निरिक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टाना रद्द केली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी मेनेसज यांच्या बेंचने याप्रकरणी सुनावणी करताना महिलांनी तोकडे कपडे (Short Cloths) घालणं ही सामान्य गोष्ट आहे. एखाद्या महिलेने छोटे कपडे घातले तर त्याला अश्लिलता म्हणता येणार नाही असं म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये (FIR) तोकडे कपडे घालून नाचत असल्याने पाच महिलांविरुद्ध अश्लिलतेचा (Obscenity) उल्लेख केला आहे. सध्याच्या जमान्यात छोटे कपडे घालणं सामान्य गोष्ट आहे. चित्रपटांमध्ये दाखवल्या प्रमाणे कपडयांची स्टाईल केली जात आहे. यासाठी कलम 294 लागू होत नाही असंही कोर्टाने म्हटलंय.


काय होतं प्रकरण?
नागपूर पोलिसांनी एका हॉटेलवर धाड टाकत पाच महिलांना ताब्यात घेतलं. या महिलांनी तोकडे कपडे घातले होते, तसंच त्या अश्लिल हावभाव करत नाचताना आढळल्या. या महिलांच्या समोर काही पुरुष बसले होते आणि हे पुरुष नाचणाऱ्या महिलांवर पैसे उधळत होते. हा प्रकार सुरु असतानाच पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि पाच महिलांना अटक केली. पोलिसांनी या महिलांवर दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या कारवाईविरोधात या महिलांनी कोर्टात धाव घेतली. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द केला जावा अशी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली.


तोकडे कपडे घालून नाचणं हे अश्लिलतेच्या वाख्येत मोडत नाही असा दावा या याचिकेत करण्यात आला, तसंच पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा अशी मागणीही या महिलांनी केली. या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी घेण्यात आली. वकील अक्षय नाईक यांनी तक्रारदा महिलांची बाजू मांडली. वकील अक्षय नाईक यांनी केलेल्या युक्तावादानुसार समोर बसलेल्या पुरुषांना मुलींच्या नाचण्याचा कोणताही त्रास वाटत नव्हता. त्यांना अनैतिक वाटेल असा कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे या महिलांचं नाचणं अश्लील कृत्य ठरु शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं.


तर महिलांचं अश्लिल नृत्य सुरु असल्याची तक्रार आल्यामुळे नाराज झालेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली त्याआधारे पोलिसांनी छापा टाकला असा युक्तीवद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर तोकडे कपडे घालून प्रक्षोभक हातवारे करत नाचणं हा प्रकार अनैतिकतेच्या व्याख्येत येऊ शकत नाही, असं निरिक्षण नोंदवलं. तसंच या महिलांवरील गुन्हे रद्द केले आहेत.