Interesting News : पृथ्वीवर भूखंडाहून जास्त भाग हा पाण्याचाच असून, त्यामध्ये महासागराचा भाग सर्वाधिक आहे. याच महासागरातून जगाच्या उत्पत्तीची अनेक गुपितं समोर आली आहेत. किंबहुना आजही या समुद्रांच्या पोटातून काही अशा गोष्टी आपल्यासमोर येतात की आश्चर्याचा धक्काच बसतो. कैक वर्षांपूर्वी भारतातील समुद्रात असाच खजिन्याचा साठा सापडला आणि त्या क्षणापासून देशानं प्रगतीपथावर जी यशस्वी वाटचाल सुरु केली ती आजही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 50 वर्षे उलटूनही समुद्राच्या पोटात असणारा हा भरमसाट खजिना संपतच नाहीये. त्यामुळं शेजारी राष्ट्रही थक्क होऊ लागले आहेत. हे ठिकाण कुठंय तुमच्या लक्षात आलंय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील हा खजिन्याचा साठा म्हणजे मुंबई हाय फील्ड (Mumbai High Field) किंवा बॉम्बे हाय. देशातील एक मोठं आणि महत्त्वाचं खनिज तेल क्षेत्र म्हणूनही त्याची ओळख. 1974 मध्ये रशिया (Russia) आणि भारत (India) या दोन्ही राष्ट्रांच्या प्रयत्नांनी या खनिज तेल साठ्यांचा शोध लावण्यात आला होता, ज्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला कमाल बळकटी मिळाली. याच बॉम्हे हायला यंदा 50 वर्षे पूर्ण झाली. 


मुंबई हाय फिल्ड अशी ओळख असणारं हे ठिकाण आधी Bombay High Field म्हणून ओळखलं जात होतं. भारताच्या कॅबे सेक्टर खाडीमध्ये मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीपासून समुद्राच्या आत साधारण 176 किमी अंतरावर (109 मैल) दूर आणि 75 मीटर (246 फूट) अंतरारील खोलीवर हे तेलाचे साठे आहेत. जवळपास 60 दशकांपूर्वी म्हणजेच 1974 मध्ये इंडो-सोवियत टीमच्या वतीनं करण्यात आलेल्या संशोधनातून याबाबतची माहिती समोर आली होती. हा शोध कोणा एका खजिन्याच्या साठ्याहून कमी नव्हता हे येणारा काळ पावलोपावली सांगत गेला. पुढे 21 मे 1976 पासून इथं कच्च्या तेलाच्या उत्पादनास सुरुवात झाली. 


हेसुद्धा वाचा : Job News : 'रुको जरा...' नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ


Crude Oil निर्मिती आणि उत्पादन क्षेत्रामध्ये मुंबई हाय फिल्डचा मोलाचा वाटा आहे. सुरुवातीला इथं जवळपास साडेतीन हजार बॅरल तेलाचं उत्पादन घम्यात येत होतं. पुढं हा आकडा वाढून प्रतिदिवस 80,000 बॅरलवर पोहोचला. 1998 मध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनाचं गाठलं गेलं. पुढे या प्रक्रियेला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि टँकरच्या माध्यमातून तेल विविध तेलशुद्धीकरण प्रकल्पांमध्ये पाठवण्याऐवजी 'सब-सी' पाईपलाईनच्या माध्यमातून तेल अपेक्षित स्थळी पोहोचवण्यास सुरुवात झाली. 


ONGC च्या माहितीनुसार सुरुवातीच्या 50 वर्षांमध्ये मुंबई हाय फिल्डमधून  52.7 कोटी बॅरल तेलाचं उत्पादन करण्यात आलं आहे. थोडक्यात इथून आतापर्यंत 221 अब्ज घनमीटर गॅसनिर्मिती करण्यात आली आहे. देश पातळीवर हा आकडा 70 टक्क्यांच्या भागिदारीकडे खुणवतो. अधिकृत आकडेवारीनुसार या क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतोय ही बाब अधिक स्पष्ट होत आहे. 


सद्यस्थिती काय? 


सद्यस्थितीविषयी सांगावं तर, मुंबई हाय येथून दर दिवशी साधारण 1.35 लाख बॅरल तेल निर्मिती आणि 13 अब्ज घनमीटर गॅस तयार केला जातो. या दोन्ही प्रकल्पांमध्ये सरकारच्या वतीनं जे पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत त्यांच्यामध्ये केल्या गेलेल्या गुंतवणुकीचा आकडाही मोठा आहे. येत्या काळात या क्षेत्राचा आणखी विकास होणार असून, तेलाचा तुटवडा होऊ नये यासाठीसुद्धा इथं मुबलक साठे असल्याचं सांगण्यात येत आहे.