मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने घाटकोपर विमान दुर्घटनेची दखल घेतली आहे. जुहू विमानतळाच्या बाबतीत डिजीसीएने गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. गुरूवारी झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याची उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मेट्रो-२ बीच्या उंची बाबत दाखल एका याचिकेदरम्यान एअरपोर्ट अथॉरीटी ऑफ इंडियाला मेट्रोच्या उंची बाबत निर्णय घेण्याचे अधिकार असून परवानगी देताना नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असल्याचं उच्च न्यायालयानं निदर्शनास आणून दिलं आहे.