रायगड : मध्य रेल्वे मार्गावर कर्जत दरम्यान मुंबई - हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावर घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लांब पल्याच्या गाड्यांवर परिणाम झालाय. तसेच मुंबई फास्ट लोकलवर याचा परिणाम दिसत आहे. अनेक गाड्या खोळंबळ्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई - हैदराबादचे इंजिन कर्जत लोणावळा दरम्यान ठाकूरवाड़ी रेल्वे स्टेशन घाट परिसरात घसरले. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या जलद रेल्वे गाड्या काही तास उशीराने धावत आहेत.


मुंबई- कन्याकुमारी एक्स्प्रेस कल्याणला थांबविण्यात आली आहे. वांगनी येथे मुंबई-भुनेश्वर कोणार्क एक्सप्रेस थांबविण्यात आलेय. मुंबई-नांदेड़ कर्जतला थांबविण्यात आली आहे. तर डेक्कन आणि प्रगती एक्सप्रेस कर्जतच्या दिशेकडे वळविण्यात आल्या आहेत. कल्याणहून रेल्वेचे अपघात पथक घटनास्थळाकडे रवाना झालेय. या अपघातत कोणतीही हानी झालेली नाही.