मुंबई : मुंबई अनलॉक होण्याच्या दिशेने असली तरी मुंबईतील ५० लाख लोकसंख्या अजूनही कंटेनमेंट झोन आणि सिल केलेल्या इमारतींमध्ये बंदिस्त आहे. मुंबईत सध्या ७९८ कंटेनमेंट झोन असून याअंतर्गत ९५,०७८ घरांची संख्या येते. या कंटेनमेंट झोनमध्ये ४२ लाख १८ हजार लोक राहतात. या कंटेनमेंट झोन असलेल्या भागात १८, ९५७ कोरोना रुग्ण आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच मुंबईतील ४५३८ इमारतीही कोरोना रुग्ण आढळल्याने सील केल्या असून या इमारतींमध्ये १८ हजार घरं आहेत. या सील केलेल्या इमारतींमध्ये ८ लाख २ हजार लोक राहतात. तर इथं ९,९५६ कोरोनाबाधित आहेत


मालाडचा भाग येत असलेल्या पी उत्तर विभागात सर्वाधिक ७ लाख ११ हजार लोक कंटेनमेंट झोनमध्ये राहतात.


'निसर्ग'चा फटका बसलेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा- शरद पवार


 


मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. एकट्या मुंबईत देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ५० हजार १०० वर पोहचली आहे. त्यापैकी २२ हजार ९४३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १७६० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या २६ हजार ३९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


अनलॉक दरम्यान मुंबईत अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांवर, बाजाराच लोकांची मोठी गर्दी होताना दिसतेय. इतक्या मोठ्या संख्येने, एकत्र येणारी ही गर्दी जीवघेणी ठरु शकते. त्यामुळे गर्दी कमी न झाल्यास लॉकडाऊन पुन्हा होऊ शकत असल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला नियमांचं पालन करत गर्दी न करण्याचं सांगितलं आहे.


...नाहीतर पुन्हा लॉकडाऊन - उद्धव ठाकरे