मुंबई तुमची जहागीर नाही; अमित साटम यांचा संजय राऊतांना टोला
Amit Satam criticizes Sanjay Raut : जनाब संजय राऊत मुंबई ही तुमची जहागीर नाहीये. असा टोला भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Amit satam) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना लगावला आहे.
मुंबई : 'जनाब संजय राऊत मुंबई ही तुमची जहागीर नाहीये. घरात घुसायची भाषा करता पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे'. असा टोला भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Amit satam) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची आहे. भ्रष्टाचार करायचा आणि तो बाहेर काढला की किरिट भाईंवर भेकड हल्ले करायचे. आणि आता प्रविण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहाजिकच तुमचे मानसिक संतुलन ढासळले आहे. असा घणाघातही अमित साटम यांनी केला आहे.
हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नाही. पण तुमच्या सारख्यांना तुमच्याच भाषेत बोलायचे तर तुम्ही एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातली ताकद पहा. असं आव्हान साटम यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.
मुंबईचा दादा शिवसेनाच - संजय राऊत
शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्ष आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप केले आहेत.
EDकडून शिवसेना नेत्यांना (Shiv Sena leader) जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे. याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्याकडे तक्रार केली आहे.
मुंबईचा 'दादा' शिवसेना
मुंबई पोलिसांकडे ईडीची (Enforcement Directorate) चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ही मुंबई आहे हे लक्षात ठेवा, ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
ईडीच्या ऑफिसमध्ये इतरांना प्रवेश नाहीए, पण दोन तीन लोकं आहेत ते ईडीच्या ऑफिसमध्ये बसतात, ते ईडीला ब्रीफ करतात, ते ईडीला आदेश देतात, कोणाला बोलवायचं आहे, कोणाला टॉर्चर करायचं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.