MAVIM Mumbai Bharti 2023: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. महिला आर्थिक विकास महामंडळात (माविम) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्थिक विकास महामंडळात महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) आणि सल्लागारचे प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 


महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) पदासाठी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवाराला शासन नियमाप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी आपले अर्ज  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), पोटमाळा, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डींग), कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.  27 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 


TCS कडून फ्रेशर्सना नोकरीची संधी, 40 हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती


 महिला आर्थिक विकास महामंडळात पूर्णवेळ सल्लागारचे एक पद भरले जाणार आहे. तेजस्विनी प्रोजेक्टसाठी हे पद असेल. पद संख्या कमी अथवा वाढविण्याचा अधिकार संस्थेकडे असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या. यासाठी उमेदवारांना 22 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.


स्टाफ सिलेक्शनअंतर्गत बंपर भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी


मुंबई हायकोर्टात भरती 


मुंबई हायकोर्ट भरतीअंतर्गत एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येतील. ज्यामध्ये जिल्हा न्यायाधीशाच्या 4 तर वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशाच्या एका जागेचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर, नाशिक, पालघर, सोलापूर अशा जिल्ह्यांमधील कामकाज पहावे लागेल, याची नोंद घ्या. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी निकष जाहीर करण्यात आले आहेत. 30 सप्टेंबर 2020 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सेवानिवृत झालेले किंवा सेवानिवृत होणारे उमेदवार  जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज rgrp-bhc@bhc.gov.in येथे पाठवायचे आहेत. तर ऑफलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट ऑफ बॉम्बे, फोर्ट, मुंबई, 400032 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 23 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.