स्टाफ सिलेक्शनअंतर्गत बंपर भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Staff Selection Job: कर्मचारी निवड आयोगातर्फे एकूण 297 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड सी पदे भरली जातील.

Pravin Dabholkar | Updated: Oct 17, 2023, 07:40 AM IST
स्टाफ सिलेक्शनअंतर्गत बंपर भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी title=

Staff Selection Job: बारावी उत्तीर्ण असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता याचा सविस्तर तपशील देण्यात आहे. 

कर्मचारी निवड आयोगातर्फे एकूण 297 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड सी पदे भरली जातील. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे 100 शब्द प्रति मिनिट स्पीड असणे आवश्यक आहे. 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून 100 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. महिला, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज शुल्कात सवलत देण्यात येणार आहे.  21 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी

मुंबई हायकोर्ट भरतीअंतर्गत एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येतील. ज्यामध्ये जिल्हा न्यायाधीशाच्या 4 तर वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशाच्या एका जागेचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर, नाशिक, पालघर, सोलापूर अशा जिल्ह्यांमधील कामकाज पहावे लागेल, याची नोंद घ्या. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी निकष जाहीर करण्यात आले आहेत. 30 सप्टेंबर 2020 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सेवानिवृत झालेले किंवा सेवानिवृत होणारे उमेदवार  जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज rgrp-bhc@bhc.gov.in येथे पाठवायचे आहेत. तर ऑफलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट ऑफ बॉम्बे, फोर्ट, मुंबई, 400032 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 23 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.