Mumbai Local Video : प्रत्येक मुंबईकरांचा (Mumbaikar) जिव्हाळा विषय म्हणजे लोकल...मुंबईकरांसाठी लोकल (Local) म्हणजे लाइफ लाइन...दिवसातील अर्धाहून जास्त वेळ हा लोकल प्रवासात जातो. लोकल ट्रेन हे मुंबईकरांचं दुसरं घरं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लोकल ट्रेनमधून प्रवास करताना हा अनुभव अनेकांना आला असेल. ट्रेनमध्ये भाजी निवडण्यापासून गरब्या खेळनेपर्यंत अनेक धम्माल मस्ती इथे सुरु असते. असे लोकल ट्रेनचे (train) अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. पण खचाखच लोकलमध्ये एका सीटवरुन महिलांना हाणामारी करतानाचा व्हिडीओ तर सतत येत असतात. पण सध्या सोशल मीडियावर (social media) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. 


तुम्ही तर असं करत नाही ना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेनमधून प्रवास (Train travel) करताना अनेक वेळा सांगितलं जातं की रेल्वेतून (Rail) प्रवास करताना काळजी घ्या. धावत्या ट्रेनमध्ये (Running train) चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करुन नका...पण मुर्खपणा करुन जीव गमावणाऱ्या लोकांच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. 


धावत्या लोकलमधून तो खाली पडला


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेन प्लॅटफॉर्मवरून (platform) जात आहे आणि त्यात किती लोक आहेत. कदाचित ट्रेनच्या आत जागा नसेल, म्हणूनच लोक दारावर लटकत आहेत. त्याचप्रमाणे दरवाजाला लटकलेला एक व्यक्ती खाली फलाटावर असलेल्या वेगवान ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करतो  आणि तो अचानक खाली पडतो. पण त्याचं नशिब चांगलं होतं या अपघातातून  (Rail Accident) तो थोड्यात बचावला आहे. (Mumbai Local Man falls off Shocking Video Viral on social media nmp)



तुम्ही असं करु नका!


ही घटना मुंबईतील एका रेल्वे स्थानकाची आहे. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @RoadsOfMumbai नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 18 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.