मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळाच्या दुरुस्ती रेल्वेच्या तिन्ही मार्गावर २१ऑक्टोबर रोजी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहेत. 


ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर स. ११.३० ते दु.३.३० वाजेपर्यत दुरुस्तीचे काम असल्याने स. ९.२५ ते दु. २.५४ वाजेपर्यत डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद लोकल गाडयांना स. १०.३७ ते दु. ३.०६ वाजेपर्यंत मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकात थांबा देण्यात येणार असून १० मिनिटे उशीरा असणार आहेत. 


 हार्बर मार्गावर पनवेल-वाशी


तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर स. ११.३० ते दु. ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. स. १०.०३ ते दु.४.३४ वाजेपर्यंत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल बंद राहणार आहे. ब्लॉक दरम्यान पनेवल/अंधेरी मार्गाच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे-वाशी/नेरुळ विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.


पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक


बोरीवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जदल मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी २.३२ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन जदल मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे.